Shivshahi Bus Caught Fire Saam Tv
महाराष्ट्र

भररस्त्यात धावती शिवशाही बस पेटली, नाशिक-औरंगाबाद मार्गावरील थरारक घटना

बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत बसमधून उडी घेतल्यानं जीवितहानी टळली.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : औरंगाबादहून नाशिकच्या दिशेने (Nashik Aurangabad Highway) निघालेल्या शिवशाही बसला अचानक आग (Shivshahi Bus Fire) लागल्याची घटना घडली आहे. माहितीनुसार निफाड तालुक्यातील बोकडदरे परिसरात ही घटना घडली आहे. आगीत शिवशाही बस (burning-bus) पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने या कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत बसमधून उडी घेतल्यानं जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार ही बस औरंगाबादहून नाशिकच्या दिशेने येत होती. यावेळी बसमध्या १२ ते १५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र, वाटेतच बस नादुरुस्त झाल्याने बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले. त्यानंतर नादुरुस्त झालेली बस घेऊन चालक आणि वाहक नाशिकच्या दिशेने येत असताना बोकडदरेजवळ बसने अचानक पेट घेतला. बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला लावत उडी घेतली.

दरम्यान, बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आग आटोक्यात येईपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. प्राथामिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा अंदाज आहे. या घटनेचा पुढील तपास निफाड पोलीस करत आहे.

शिवशाही बसला आग लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील राज्यात अशा घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यातही सांगलीहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या शिवशाही बसला आग लागली होती. त्यावेळी चालकाने प्रसंगावधान दाखवत बस कडेला लावत प्रवाशांना बसमधून खाली उतरण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यावेळी बसमध्ये ४० प्रवाशी होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

Nashik Tourism : निसर्गरम्य टेकड्यांमध्ये वसलंय सुंदर पर्यटन स्थळ, नाशिकला गेल्यावर 'येथे' एकदा मारा फेरफटका

Jeera Water For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सकाळी प्या जिऱ्याचं पाणी, आठवडाभरातच दिसाल बारीक

Good News : लाडकीच्या खात्यात ₹ ३००० येणार, तारीखही ठरली; पण या महिलांचा लाभ कायमचा बंद, वाचा सविस्तर...

Aishwarya Narkar : "बॉलिवूड पेक्षा भारी..."; ऐश्वर्या नारकरचा नवऱ्यासोबत ट्रेंडिंग गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO पाहिलात?

SCROLL FOR NEXT