mumbai nagpur highway, traffic jam, buldhana rain saam tv
महाराष्ट्र

Dongaon : साेन्याच्या मण्यांचा पाऊस पडलाे हाे....! गर्दीमुळं मुंबई नागपूर महामार्ग ठप्प

अखेर गर्दी हटविण्यासाठी पाेलिसांना बाेलवावं लागलं.

संजय जाधव

Mumbai Nagpur Highway Traffic Jam : तुम्हांला जर साेन्याच्या मण्यांचा पाऊस (rain) पडला आहे असं समजलं तर तुम्ही काय कराल ? हाेय ! तुम्ही बराेबर वाचत आहात साेन्याच्या मण्यांचा पाऊस पडताेय असं समजलं तर काय कराल. उत्सकतेपाेटी घटनास्थळी पाहयला जाल ना. अगदी तसंच गुरुवारी मुंबई - औरंगाबाद - नागपूर महामार्गावरील डोनगावकरांना समजलं आणि नक्की काय प्रकार आहे पाहण्यासाठी महामार्गावर माेठी गर्दी झाली. त्यामुळं मुंबई नागपूर महामार्गावरची वाहतुक तर ठप्प झालीच परंतु गर्दी हटविण्यासाठी पाेलिसांना (police) बाेलवावे लागलं.

बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई - औरंगाबाद - नागपूर महामार्गावर डोनगाव जवळ गुरुवारी दुपारच्या सुमारास महामार्गाच्या कडेला काहींना सोन्याच्या मणीसारखे मणी पडलेले आढळले. बघता बघता ही बातमी परिसरात पसरताच अनेकांनी या ठिकाणी मणी जमा करण्यासाठी धाव घेतली.

या महामार्गाच्या कडेला विखुरलेले मणी जमा करण्यात प्रत्येक जण गर्दी करत होता. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर व हे मणी सोन्याचे आहेत का..? याची शहानिशा केल्यावर सर्वांचे भानच उडालं.

हे मणी सोन्याचे नसून वेगळ्याच धातूचे निघाले व महामार्गावरून जाताना एखाद्या महिलेच्या गळ्यातील पोथ तुटून रस्त्यावर विखुरले गेले असल्याचं लक्षात आल्यावर दोन तासांनी नागरिकांनी गर्दी कमी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT