GST माधव सावरगावे
महाराष्ट्र

सरकारला दोनशे कोटींचा गंडा! दिल्लीतील भंगार विक्रेत्याला औरंगाबादमध्ये अटक

भंगार विक्रीचा कोणताही व्यवहार न करता बनावट बिले तयार करून जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटच्या माध्यमातून सरकारला (Government) जवळपास दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त गंडा या व्यापाराने घातल्याची अंदाज आहे.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद : सरकारला जवळपास दोनशे कोटींचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील (Delhi) एका भंगार विक्रेत्याला जीएसटी विभागानं (GST) अटक केलीय. समीर मलिक असं भंगार विक्रेत्याचं नाव आहे. भंगार विक्रीचा कोणताही व्यवहार न करता बनावट बिले तयार करून जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटच्या माध्यमातून सरकारला (Government) जवळपास दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त गंडा या व्यापाराने घातल्याची अंदाज आहे.

या घोटाळ्यात सहभागी झालेल्या औरंगाबादमधील (Aurangabad) वाळूज, हनुमान नगर येथील एका भंगार दुकानावरही धाड टाकण्यात आलीय. त्यातून आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. (Aurangabad News In Marathi)

औरंगाबादमधील १५ व्यवसायिक आहेत, ज्यांच्याकडे त्यांनी बनावट बिलाच्या आधारावर व्यवहार केला आहे. मूळचा दिल्लीचा असणारा समीर मलिक यांनी औरंगाबाद शहरातील नारेगाव परिसरात सनसाईज एंटरप्राइजेस नावाने भंगार खरेदी विक्री व्यवसायाची बोगस नोंदणी केली होती. (GST Fraud)

हे देखील पहा-

त्या बोगस कंपनीच्या नावावरून कोट्यवधींचे बोगस बिल तयार केले होते. त्यातून जवळपास दहा कोटी रक्कम औरंगाबाद शहरातील पंधरा व्यवसायिकांना पाठवली होती. या व्यवहारात काहीतरी गडबड असल्याचे जीएसटी विभागांच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी समीर मलिक याला औरंगाबादमध्ये बोलवून अटक केली. यामध्ये औरंगाबाद मधील पंधरा भंगार विक्रेते असल्याचं जीएसटीच्या लक्षात आल्याने कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT