satara, Pune Bangalore National Highway saam tv
महाराष्ट्र

Pune Bangalore National Highway : पुणे- बंगळुरू महामार्गावर आरपीआयचा रास्ता राेकाे, जाणून घ्या वाहतूकीची स्थिती

हा मोर्चा पुढे मुंबईच्या दिशेने रवाना झाला.

ओंकार कदम

Satara News : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग मधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावची कमान पाडल्याच्या निषेधार्थ निघालेला मोर्चा आज (शुक्रवार) साता-यात येथे पोहोचला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) वाढे फाटानजीक रास्ता रोको केला. (Maharashtra News)

आरपीआयचे पदाधिकारी म्हणाले सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असणा-या बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान काही गाव गुंडांनी पाडली. त्याच्या विरोधात बेडग ते मुंबई असा पायी मोर्चा बांधवांनी काढला आहे.

या आंदाेलकांना आमचा पाठींबा व्यक्त करण्यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन देखील करण्यात येत आहे. दरम्यान या आंदाेलनामुळे काही काळ पुणे- बंगळुरू महामार्गावरील वाहतूक खाेळंबली.

पाेलिसांच्या आवाहनानंतर आंदाेलकांनी रस्ता माेकळा केला. हा मोर्चा पुढे मुंबईच्या दिशेने रवाना झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walmik Karad Case : संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडची सुटका नाहीच; पुढील सुनावणी ४ ऑगस्टला

Amravati : 'सफेद चावल' कोडवर्डने एमडी ड्रग्जची विक्री; अमरावतीतून दोन्ही डिलिव्हरी बॉय ताब्यात

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री कोकाटे यांच्या अंगावर पत्ते उधळण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळला, नवऱ्याने पेटवून घेतलं, नांदेडमधील धक्कादायक घटना

'त्या' महिलेवर २ पोलिसांकडून बलात्कार, फ्लॅटवर बांगलादेशी महिलांसोबत रासलीला; हनी ट्रॅप प्रकरणातील महिलेचा खुलासा

SCROLL FOR NEXT