महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रिपाइं (आ) चे पीठ दळून आंदोलन विनोद जिरे
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रिपाइं (आ) चे भर रत्यात दळण दळत आंदोलन...

"आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं" अशी म्हण लिहीलेले पोस्टर्स झळकवत रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी चक्क भर रस्त्यात जात्यावर पीठ दळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध आहे.

विनोद जिरे

बीड: शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपयांची मदत करा, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण पूर्ववत करा या मागण्यांसाठी बीडमध्ये रिपाइंच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारची अवस्था आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी झाली आहे. हे दाखवण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक देखावा करत रिपाईच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं.

हे देखील पहा -

यावेळी राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले होते. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्य सरकारने शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी, फक्त घोषणा करून आणि आश्वासन देऊन चालत नाही, ओबीसी आरक्षण पूर्वरत करावे, तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अन्यथा रिपाईच्या वतीने मंत्र्यालयावर मोर्चा काढू. असा इशारा रिपाईचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT