Crime  Saam Tv News
महाराष्ट्र

Crime: डोळ्यातून रक्त निघालं, शरीर काळंनिळं पडलं; RPF जवानावर मद्यधुंद व्यक्तीकडून प्राणघातक हल्ला

Lonand Railway Station Turns Crime Scene After Deadly Attack on RPF Personnel: लोणंद रेल्वे स्थानकावर ड्युटीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) जवानावर तिघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

लोणंद रेल्वे स्थानकावर ड्युटीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) जवानावर तिघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ११ आणि १२ एप्रिलच्या मध्यरात्री हा प्रकार घडला असून, जखमी जवानाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून एकाला अटक झाली असून, २ फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

जयप्रकाश अमृत निषाद असे आरपीएफ जवानाचे नाव आहे. ते ११ आणि १२ एप्रिलला रात्री ८ ते सकाळी ८ या शिफ्टमध्ये होते. ड्युटीदरम्यान स्थानकाच्या तिकीट काउंटरजवळ एक संजय नावाचा माणूस मद्यधुंद अवस्थेत झोपलेला होता. जवानाने त्याला घरी जाऊन विश्रांती घ्या असे सांगितले. यामुळे संजय संतापून शिव्या देत धमकी देऊन निघून गेला.

काही वेळातच संजय आपल्या भाऊ निहाल आणि आईसोबत परत आला. संजयच्या आईने हार्ड प्लास्टिकच्या पाइपने जयप्रकाश यांच्या पायावर मारले, तसेच निहालने लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर वार केला. ज्यामुळे डोळ्यांतून रक्त वाहू लागले. त्यांच्या उजव्या हातावरही जबर मार बसला. तिघांनी मिळून जयप्रकाश यांना मारहाण केली.

मारहाणीनंतर त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त प्रियांका शर्मा आणि रेल्वे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी रुग्णालयात जाऊन जखमी आरपीएफ जवानाची विचारपूस केली.

या प्रकरणी मिरज पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक एस.एस. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने एक आरोपी संजय राजू पवार याला अटक केली असून उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT