Beed News विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: कोरोना नियमांना हरताळ फासत शाही पार्टीचे आयोजन

तहसीलदारांच्या गाडीत आलेल्या कर्मचाऱ्यांनी केवळ थातूरमातूर कारवाई कुणाच्या सांगण्यावरून केली? सामान्यांना एक न्याय आणि राजकीय वरदहस्त असणाऱ्या व्यक्तींना एक न्याय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विनोद जिरे

बीड - शहरात पुन्हा एकदा कोरोना (Corona) नियमांना हरताळ फासत, लहान मुलं-महिलांसह शेकडोंच्या उपस्थितीत शाही पार्टीची दावत करण्यात आली आहे. शहरातील आशीर्वाद लॉन्समध्ये पटेल कुटुंबियांकडून दावत देत या शाही पार्टीचे (Party) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जेवढे लहान मुलं होते, तेवढ्याच प्रमाणात महिला पुरुषांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या शाही पार्टीला शहरातील अनेक लोकप्रतिनिधी, पुढारी आणि प्रतिष्ठित व्यक्ती देखील होते. तर यापैकी अनेकांच्या तोंडाला मास्क (mask) देखील नव्हते. (Latest Beed News)

हे देखील पहा -

तर यादरम्यान तहसील प्रशासनाची गाडी देखील आली होती. यामध्ये 3 पोलीस कर्मचारी, तलाठी आणि नगर पालिका कर्मचारी होते. मात्र आयोजक हे राजकीय असल्याने 1 हजार रुपये पावती फाडा, असं म्हणत आयोजकांनी अनेकांना फोन फिरवला आणि शेवटी दंडात्मक कारवाई करत, गाडीत आलेल्या कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला.

एकीकडं राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने, कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्नसमारंभाला केवळ 50 व्यक्तींची परवानगी आहे. त्यावर कोणी असेल तर प्रत्येक व्यक्तीला 500 रुपये फाईन आहे. मग या तहसीलदारांच्या गाडीत आलेल्या कर्मचाऱ्यांनी केवळ थातूरमातूर कारवाई कुणाच्या सांगण्यावरून केली? सामान्यांना एक न्याय आणि राजकीय वरदहस्त असणाऱ्या व्यक्तींना एक न्याय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दंड भरा नावाला आणि संसर्ग करा सर्वाला जणू काही असाच नियम बीडमध्ये सुरु आहे का? असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT