एसटी बसेसच्या असंख्य फेऱ्या इंधन अभावी रद्द; प्रवाशांची हेळसांड  संजय जाधव
महाराष्ट्र

एसटी बसेसच्या असंख्य फेऱ्या इंधन अभावी रद्द; प्रवाशांची हेळसांड

बुलढाणा जिल्ह्यातील 7 आगारात डिझेलची कमतरता भासत असल्याने अनेक बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. अशी माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा: बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील 7 आगारात डिझेलची कमतरता भासत असल्याने अनेक बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. अशी माहिती एसटी महामंडळाच्या ST वतीने देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

गेल्या महिन्याभरापासुन डिझेल मिळत नसल्याने अगोदरच डबघाईस आलेली एसटी शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या काळात एसटी सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. कोरोना थोडाफ़ार आटोकयात आल्याने आता कुठे एसटी सुरु करण्यात आली आहे, मात्र एसटीचे उत्पन्न अल्पप्रमाणात येत असल्याने एसटी ला मोठा आर्थिक फटका बसत आहे.

तसेच पूर्वी 60 रुपये लीटर डिझेल एसटीला मिळत होते. मात्र आता ते डिझेल 90 रूपयाला मिळत आहे तर टिकिट दर हा 60 रुपये लीटर डिझेलच्या आधारावरच असल्याने एसटीला सेवा देणे परवडत नाही. कारण 90 रुपये लीटर डिझेलच्या भावाने टिकिट दरात वाढ होने अपेक्षित आहे. मात्र तिकितदर वाढ न झाल्याने मोठा आर्थिक फटका एसटीला सहन करावा लागत आहे. त्यांमुळे जिल्ह्यातिल 7 ही आगारातील 50 टक्के बस फेरया रद्द करण्यात आल्या आहेत.

त्याच बरोबर एसटी प्रवाशांमध्ये वाढ पाहिजे तश्या प्रमाणात वाढली नाही. सर्वांच्या मनात कोरोनाची भीती आहे. त्यामुळे प्रवाशीसंख्या घटली आहे. अश्या परिस्थितीत एसटी फेऱ्या पूर्ववत ठेवणे कठीण झाले आहे. त्याच मुळे असंख्य एसटी फेऱ्या डिझेल अभावी रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. गोरगरीबांची एसटी सुरु करावी अशी मागणी प्रवासी करीत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT