Rohit Pawar's attack on Padalkar, Rohit Pawar News, Gopichand Padalkar News Saam TV
महाराष्ट्र

बिरोबाची शपथ पाळली नाही, त्यांना हिंदू धर्म काय कळला? रोहित पवारांचा पडळकरांवर हल्लाबोल

'या ठिकाणी ९० टक्के धनगर लोकं होती, मग ते पैसे घेऊन आले अस म्हणायचं आहे का? असं म्हणताना लाज वाटायला पाहिजे.'

डाॅ. माधव सावरगावे

अहमदनगर : 'ज्यांनी बिरोबाची शपथ घेऊन पाळली नाही, त्यांना हिंदू धर्म काय कळला? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर टीका केली आहे. आज सकाळपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (AhilyaDevi Holkar) यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे जाण्यापासून गोपिचंद पडळकर यांना पोलिसांनी रोखलं होतं. (Rohit Pawar News updates in Marathi)

चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि आमदार रोहित पवार हे देखील आले होते. त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी पडळकर (Gopichand Padalkar) यांना रोखलं होतं. मात्र, पडळकरांनी पोलिसांच्या या कृतीचा निषेध करत शरद पवारांवर देखील टीका केली.

पवारांच भाषण संपल्याशिवाय आपणाला सोडण्यात येणार नाहीये, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पडळकर म्हणाले, 'पवारांच्यामध्ये या गोरगरीब जनतेसमोर आपणाला फेस करायची धमक नाही. पोलिसांचा उपयोग करुन आम्हाला अडवणार असाल तर भाषणातून काय विचार मांडणार आहात, आम्हाला वेळ देणारे पवार कोण? असा सवाल देखील उपस्थित करत त्यांनी पवारांवर टीका केली.

तसंच आम्ही तिथे गेलो तर फक्त दर्शन घेऊ, तुम्हाला कसली भिती वाटतेय, पवारांनी नाटकं करायची गरज नाही असंही ते यावेळी म्हणाले होते या सर्व पार्श्वभमिवर बोलताना रोहित पवारांनी पडळकरांवर सडकून टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले, 'पडळकर खूप चांगली अँटिंग करतात, व्यक्तिगत स्टंट पडळकरांनी केला, त्यांची चिडचिड होणार कारण खूप मोठया प्रमाणात गर्दी केली. पडळकरांचे भाषण हे थर्ड ग्रेडचे भाषण होतं. शिवाय मातीत घालायचं की नाही ते लोकं ठरवतील. रोहित पवार लहानपणापासून किती वेळा इथे आला ते बघा. मागच्या वेळी राम शिंदे यांची सभा उधळून लावली. कारण तुम्हाला टीव्ही वर दिसायच होत. तसंच पडळकरांची मागच्या ४ दिवसांची भाषण ऐकली तर दगडफेक करा अशा स्वरूपाची होती त्यामुळे पोलीस कारवाई करणारच की' असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

तसंच या ठिकाणी ९० टक्के धनगर लोकं होती, मग ते पैसे घेऊन आले अस म्हणायचं आहे का? असं म्हणताना लाज वाटायला पाहिजे. इथली वस्तू ही भाजपच्या काळात झाली नाही, इथल्या भिंती पडायला लागल्या राम शिंदे यांना म्हणावं समोर येऊन बोला असा इशाराही रोहित पवारांनी यावेळी शिंदेना दिला. दरम्यान, इथं सगळ्यात चांगली वस्तू म्हणजे राम शिंदे यांचा बंगला आहे असा टोलाही रोहित यांन यावेळी लगावला. तसंच ज्यांनी बिरोबाची शपथ घेऊन पाळली नाही त्यांना हिंदू धर्म काय कळला असा हल्लाबोल देखील रोहित पवारांनी पडळकरांवर केला. दरम्यान या सर्व प्रकरणानंतर तब्बल दोन तासांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना चौंडीत प्रवेश दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT