Rohit Pawar addresses media amid rising security concerns following Ajit Pawar death controversy. Saam Tv
महाराष्ट्र

रोहित पवारांच्या जीवाला धोका? पवार कुटुंबाला रोहित पवारांची काळजी

Pawar Family Reaction On Rohit Pawar Security Issue: अजित पवारांच्या मृत्यूनंतर पत्रकार परिषदांच्या मालिकेतून सवाल उपस्थित करणाऱ्या रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आलाय.. मात्र रोहित पवारांना कुणाच्या जीवाला धोका आहे.. आणि त्याबाबत पवार कुटुंबातून काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत..

Bharat Mohalkar

अजित पवारांचा अपघात की घातपात... याबद्दल राज्यभरातून संशय व्यक्त केला जात असतानाच आता रोहित पवारांनी पुरावे आणि तथ्य समोर ठेवून आरोपांची मालिकाच सुरु केलीय...त्यामुळेच रोहित पवारांची काळजी वाटत असल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.. खुद्द रोहित पवार यांनीही आपण दादांच्या मृत्यूबद्दलच तथ्य आणि पुरावे समोर मांडत असल्यानं कुटुंबाला भीती वाटत असल्याचं जाहीरपणे पत्रकार परिषदेत म्हटंल होत..

आता पवार कुटुंबातूनही रोहित पवार यांच्या सुरक्षेबद्दल काळजी व्यक्त करण्यात आल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवारांसाठी पोलीस संरक्षणाची मागणी केलीय.. दुसरीकडे सरकारतर्फे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित पवारांच्या सुरक्षेवर भाष्य केलंय.. पोलीस संरक्षणाची गरज असेल तर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे संकेत उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिलेत.. मात्र ज्या नेत्यांना सुरक्षेची गरज आहे... त्यांना सरकारतर्फे कोणती सुरक्षा दिली जाते...

X सुरक्षा- यामध्ये 2 सशस्त्र पोलीसांचा समावेश असतो... महाराष्ट्रातील बहुतांश आमदारांना X सुरक्षा दिलेली आहे...

Y सुरक्षा- यामध्ये 8-11 पोलीस असतात.. त्याबरोबरच 1 किंवा 2 कमांडोही सुरक्षेसाठी तैनात असतात

Y+ सुरक्षा- यात 2-4 कमांडो आणि 8 ते 11 सुरक्षा रक्षक असतात. ही सुरक्षा कॅबिनेट मंत्री आणि महत्वाच्या नेत्यांना दिली जाते

Z सुरक्षा- या श्रेणीत 4-6 कमांडोसह 22 सुरक्षा रक्षकांची फौज असते... याबरोबरच एक एस्कॉर्ट गाडीही देण्यात येते

Z+ सुरक्षा- या श्रेणीत एनएसजी आणि सीआरपीएफचे 10 कमांडो, बुलेटप्रुफ गाड्यांसह 55 सुरक्षा रक्षक असतात... ही सुरक्षा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिली जाते

दादांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असताना रोहित पवारांच्या जीवालाही धोका असल्याचं म्हटलं जातंय.. त्यामुळे सरकार रोहित पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना कशाप्रकारे सुरक्षा पुरवणार.... याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT