Rohit Pawar On Nilesh Lanke  Saam Digital
महाराष्ट्र

Rohit Pawar On Nilesh Lanke : निलेश लंके गजा मारणे भेट,...पण रोहित पवारांनी का मागीतली माफी?; जाणून घ्या

Maharashtra Politics 2024 : नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गजा मारणे याची भेट घेऊन सत्कार स्वीकारल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर रोहित पवार यांनी माफा मागीतली आहे.

Sandeep Gawade

नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील गजा मारणेच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माफी मागितली आहे. निलेश लंके यांच्या प्रचारात सक्रिय असलेला मी एक कार्यकर्ता आहे आणि जी गोष्ट घडली ती चुकीच आहे. निलेश लंके यांनी देखील याबद्दल माफी मागितली असून मी देखील माफी मागत आहे, या विषयावर आता कोणी राजकारण करू नये, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

पुणे परिसरातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्या घरी जाऊन निलेश लंके यांनी सत्कार स्वीकारल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विरोधकांनी निलेश लंकेंच्या गजा मारणेच्या भेटीवरून टीकेची झोड उठवली आहे. निलेश लंकेंनी यावर सावरासावर करत आपल्याला ती व्यक्ती कोण असल्यांचं माहिती नव्हतं असं म्हणत माफी मागीतली आहे. त्यांच्या मदतीला जयंत पाटील आणि रोहित पवार धावून आलेत. रोहितदादांनी स्वतः पुढे येत लंकेंच्या या भेटीबद्दल मी माफी मागतो, असं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकालामध्ये अजित पवार गटाला चांगल यश मिळालं नाही. आता लगेचच शिखर बँकेबाबत कोणी आक्षेप नोंदवत असेल तर विचार करावा लागणार आहे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. शिखर बँकेबाबत आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट सादर केला असून यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत बोलताना रोहित पवार यांनी, आम्ही तर ईडीबाबत संघर्ष करत आहोत शिखर बँकेबाबत अजित दादा काय करतील तो त्यांचा आणि त्यांच्या वकिलांचा प्रश्न आहे. आम्ही मात्र ही लढाई लढत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे

अहमदनगर येथे राष्ट्रवादी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांमध्ये जयंत पाटील यांनी चार महिन्यानंतर आपण स्वतःहून राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य केलं होतं, हे वक्तव्य आमदार रोहित पवार यांच्याशी जोडीलं गेलं यावर बोलताना रोहित पवार यांनी, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीच्या यशातील श्रेय सामान्य जनतेला देण्याबाबत मी आणि जयंत पाटील एकाच विषयावर बोललो आणि मी जे ट्विट केलं होतं त्याचा अर्थ देखील वेगळा निघतो त्यामुळे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत आपली कोणतीही भूमिका नसल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Maharashtra Fort : ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे किल्ला, २-३ तासांचा थरार ट्रेक करून गाठता येतो माथा

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

SCROLL FOR NEXT