रोहित पवार 
महाराष्ट्र

जामखेडसाठी रोहित पवारांचा मास्टर प्लॅन

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार रोहित पवारांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार रोहित पवार प्रयत्नशील आहेत. विविध विभागांच्या माध्यमातून विकासकामांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या मागणीला सर्वच विभागांकडून दुजोरा मिळतो. आपणही कर्जत-जामखेडच्या विकासासाठी आमदार रोहित पवारांच्या पाठीशी उभे आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

खर्डा (ता. जामखेड) येथे वखार महामंडळाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या तीन हजार टन क्षमतेच्या, सोळा हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या तीन कोटींच्या गोडाउनच्या कामास प्रारंभ करताना ते बोलत होते. Rohit Pawar made a master plan for the development of Jamkhed

आमदार रोहित पवार, वखार महामंडळाचे अध्यक्ष दीपक तावरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रेय वारे, सभापती सूर्यकांत मोरे, विजयसिंह गोलेकर, सरपंच आसाराम गोपाळघरे उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, की येथील गोडाउनमध्ये शेतकऱ्यांनी माल ठेवल्यानंतर त्यांना त्याच दिवशी मालाच्या किमतीच्या सत्तर टक्के रक्कम बँकेच्या माध्यमातून व्याज स्वरूपात दिली जाईल आणि मालाला चांगला भाव आल्यानंतर शेतकऱ्यांना तो विकता येईल. Rohit Pawar made a master plan for the development of Jamkhed

आमदार रोहित पवार म्हणाले, की तालुक्यातील शेतकऱ्यांची गरज पाहून वखार महामंडळाच्या माध्यमातून गोडाउनची सुविधा खर्डा येथे होत असून, त्याचे काम सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणार आहोत. वखार महामंडळाचे अध्यक्ष तावरे यांनी प्रास्ताविक केले. विजयसिंह गोलेकर यांनी सूत्रसंचालन केले. दत्तराज पवार यांनी आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांच्या नातीचा लग्नातला रॉयल लूक, भरजरी लेहेंग्यात सजली नवरी; पाहा Unseen Photos

Accident News : बर्थडेच्या दिवशीच काळाचा घाला; भरधाव कार अपघातात फुटबॉलपटू आणि तरुणीचा मृत्यू

Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! रेल्वे रुळाखाली 'अंडरपास' अन् वर 'फ्लायओव्हर'; असा सुटणार वाहतुकीचा वेढा

Maharashtra News Live Update : सहा बंडखोर खासदार मुंबईत दाखल

Child swallowed magnet: धक्कादायक घटना! खेळता खेळता सात वर्षांच्या मुलीने गिळला चुंबक, डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव

SCROLL FOR NEXT