Rohit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Rohit Pawar: आजोबांप्रमाणे नातूही क्रिकेट मैदानात; महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवारांची निवड

पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवारांनी बिनविरोध निवडून येत बाजी मारली आहे.

Ruchika Jadhav

Rohit Pawar: पवार घराण्यातील काही व्यक्तींनी राजकीय वर्तुळासह मैदानी खेळांत नेतृत्व केले आहे. अशात आता आमदार रोहित पवार यांनी देखील त्याच दिशेने झेप घेतली आहे. रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यपदी निवड झाली आहे. पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवारांनी बिनविरोध निवडून येत बाजी मारली आहे. (Latest Rohit Pawar News)

रोहित पवार असोशिएशनच्या निवडणुकीत क्लब गटाकडून विजयी ठरले. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्यांमध्ये देखील त्यांची निवड करण्यात आली. ८ जानेवारी रोजी सायंकाळी पुण्यातल्या गहुंजे येथील स्टेडीअमवर असोशिएशनच्या कमिटीची एक बैठक पार पडली. या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पवार कुटुंबातील अन्य राजकीय नेत्यांनी या आधी मैदानांवर देखील आपली भूमिका उत्तम पार पाडली आहे. शरद पवार यांनी क्रिकेट, खो-खो, कुस्ती अशा वेगवेगळ्या खेळांसाठी संघटनांकडून अध्यपदी काम केले आहे. तसेच अजित पवार सध्या राज्य ऑलिम्पिक आणि कब्बडीच्या संघटनेत अध्यक्षपदी आहेत. आता रोहित पवारांना देखील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT