Rohit pawar News  Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar News: फडणवीस ओबीसी मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar Vs Devendra Fadnavis News: काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्मण करून राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न करत आहेत." अशा शब्दांत आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

Ruchika Jadhav

विनोद जीरे

Rohit Pawar News

"दिवाळी पाडव्यानिमित्त प्रथमच पवार कुटुंबातील एका व्यक्तीला अशा पद्धतीने दुसऱ्या ठिकाणी पाडवा साजरा करावा लागत आहे. परंतु मी संदीप क्षीरसागर यांना शब्द दिला होता. त्यानुसार मी कार्यकर्त्यांसोबत पाडवा साजरा करत आहे. काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्मण करून राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न करत आहेत." अशा शब्दांत आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"बीडमध्ये 30 ऑक्टोबर रोजी जो प्रकार घडला त्यावेळी पोलीस हातावर हात ठेवून होते. अगदी साधा सायरन देखील त्यांनी वाजवला नाही. यामुळे यामागे जे लोक सहभागी आहेत. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे. आम्हाला देखील तसाच संशय आहे. राष्ट्रवादी भवन हे मुद्दामून लक्ष केले गेले, असा आरोपही आमदार रोहित पवार यांनी यावेळी केला.

तसेच आरक्षण प्रश्नावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुद्दामून ओबीसी नेत्यांना पुढे करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. वास्तविक पाहता जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी प्रश्न सोडवण्याची गरज आहे. अशा प्रकारे सभा घेऊन प्रश्न निर्माण करण्यात त्यांचा हेतू काय आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

पाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार शरद पवार यांची भेट घेणार का या प्रश्नावर अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेतात किंवा नाही हे आताच सांगता येणार नाही ते भेट झाल्यावर सांगता येईल तर दुसरीकडे अजित पवार यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून कुटुंबातील व्यक्तीला भेटायला काय हरकत आहे असे रोहित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT