Rohit Pawar News  Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar News : राजकारणात गोट्या खेळायला आलो नाही; अजित पवारांचं शिरूरमधील चॅलेंज रोहित पवारांनी स्वीकारलं

Rohit Pawar on Ajit pawar : आता अजित पवारांचं आव्हान स्वीकारत आम्ही राजकारणात गोट्या खेळायला आलो नाही, असं म्हणत रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहिदास गाडगे

शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी पक्षासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाकडून आढळराव पाटील तर शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे रिंगणात आहेत. या मतदारसंघातील शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसभेत अशोक पवार आमदार कसा होतो, हे पाहतोच, असं म्हणत अजित पवारांनी आव्हान दिलं. आता अजित पवारांचं आव्हान स्वीकारत आम्ही राजकारणात गोट्या खेळायला आलो नाही, असं म्हणत रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवारांचं अशोक पवार यांना आव्हान

आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा शेवटचा दिवस आहे. शिरूरसहित राज्यातील एकूण ११ मतदारसंघातील प्रचाराची सांगता आज पाच वाजता होणार आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीमुळे दोन्ही गटाचे नेते आमनेसामने आले आहेत. कालच्या सभेत अजित पवारांनी शरद पवार गटावर टीका केली.

तसेच यावेळी अजित पवारांनी शरद पवार गटाच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधत आव्हान दिलं. कालच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसभेत अजित पवार यांनी अशोक पवार यांना आमदार आणि मंत्री कसा होतो पाहतोच, असं आव्हान दिलं.

रोहित पवारांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान

अजित पवारांनी भरसभेत दिलेलं आव्हान रोहित पवारांनी स्वीकारत प्रत्युत्तर दिलं. अमोल कोल्हे यांच्या शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्रचारसभेत रोहित पवारांनी आव्हान स्वीकारलं.

'लोकसभा निवडणूक होऊ द्या. आपल्याला सोडून गेलेल्यांचा पक्ष सुद्धा संपणार आहे. तुम्ही जर धमकी देत असाल तर आम्ही सुद्धा बघतो. तुम्हाला काय करायचं करा. आम्ही राजकारणात गोट्या खेळायचा आलो नाही, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांचे आव्हान स्वीकारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT