Nashik News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Doctor News : उजव्या पायातला रॉड काढायचा होता, डॉक्टरांनी रुग्णाच्या डाव्या पायावरच शस्त्रक्रिया केली

Nashik News : सुभाष खेलूकर यांच्या उजव्या पायात रॉ टाकण्यात आला होता.

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

Nashik News : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णाच्या उजव्या पायाऐवजी डाव्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याचा प्रकार नाशिकच्या खासगी हॉस्पिटलमधील घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या उजव्या पायातील रॉड काढायचा होता. मात्र डॉक्टरांनी डाव्या पायाची शस्त्रक्रिया केल्याचा आरोपी नातेवाईकांनी केला आहे.

सुभाष खेलूकर यांच्या उजव्या पायात रॉ टाकण्यात आला होता. तो काढण्यासाठी ते नाशिकमधील नामांकित हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले होते. डॉक्टरांना डाव्या गुडघ्याला सुरुवातीला कापले आणि नंतर टाके टाकले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही वेळाने रुग्णाला जाग आल्याने सगळा प्रकार लक्षात आला.

याप्रकरणी हलगर्जीपणा आणि अयोग्य शस्त्रक्रिया केल्याने डॉक्टरांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. (Latest News Update)

डॉक्टरांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहे. त्यांच्या डाव्या पायाला अपघाताने जखम झाली आहे. त्या जखमेवर उपचार करुन टाके टाकले आहेत. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनाही कल्पनाही दिली होती. यामुळे त्यांच्या पायाला कुठलाही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT