Buldhana News संजय जाधव
महाराष्ट्र

Buldhana: जबरी चोरी करणारी टोळी गजाआड, एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...

याशिवाय नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ६ गुन्ह्यांची कबुली चोरट्यांनी दिली आहे.

संजय जाधव

बुलढाणा - जिल्ह्यासह अन्य विदर्भ व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत जबरी चोऱ्या करणारी टोळी बुलढाणा (Buldhana) स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. यात एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून बकऱ्या चोरीचे १७ गुन्हे, वाहनातील बॅटरी चोरीचे १२ गुन्हे आणि मेहकर येथील जबरी चोरीचा १ गुन्हा असे जिल्ह्यातील ३० गुन्हे उघडकीस आले आहेत. याशिवाय नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद (Aurangabad) व जालना (Jalna) जिल्ह्यातील ६ गुन्ह्यांची कबुली चोरट्यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

त्यांच्या ताब्यातून १० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शैलेश राठोड, बादल गोकुल शेरे, विलास रोहिदास चव्हाण व अर्जुन प्रकाश चव्हाण अशी अटककरण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रात्रीच्या वेळी चारचाकी वाहनातून बुलढाणा आणि बाहेरील जिल्ह्यात जाऊन बांधलेल्या बकऱ्या, रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या वाहनाच्या बॅटऱ्या काढून त्या वाहनात टाकायच्या, तसेच मोटारसायकली चोरायच्या अशी गुन्हेगारांची पद्धत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

चोरट्यांकडून ६० हजार रुपये रोख, ७ दुचाकी अंदाजे किंमत १ लाख ५० हजार, १० नग बॅटऱ्या अंदाजे किंमत १ लाख, १ कार अंदाजे किंमत ५ लाख असा एकूण १० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Edited By - Shivani Tichkuel

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT