satara , nawaja waterfall , Road, ozarde waterfall saam tv
महाराष्ट्र

Ozarde Waterfall : सावधान ! ओझर्डे धबधबा पाहायला निघालांत ? नवजा रस्त्यास पडलयं भगडाद

प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करु लागले आहेत.

ओंकार कदम

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातील सर्वात जास्त पावसाची (rain) नोंद होणारे ठिकाण म्हणून ज्या भागाची ओळख आहे त्या नवजा येथे रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे. यामुळे नवजा रस्त्यावरुन जाणा-या वाहनधाकरांना धोकादायक रित्या प्रवास (travel) करावा लागत आहे. (nawaja waterfall latest news)

कोयना भागात गेल्या १५ दिवसांपासून पाऊस कमी जास्त प्रमाणात सुरूच आहे. नवजा हे ठिकाण सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण म्हणुन ओळखले जाते. आतापर्यंत या ठिकाणी २६३२ मिली मीटर पावासाची नोंद झाली आहे.

आता याच परिसरात ओझर्डे धबधब्याजवळच (ozarde waterfall) नवजा रस्त्यास मोठे भगदाड पडले आहे. नवजा रस्त्यास भगदाड पडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भगदाडामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर पर्यटकांची वर्दळ असते त्यामुळे प्रशासनाने तातडीने हालचाली करुन रस्ता दुरुस्त करणे आवश्यक बनलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: - नागपूरच्या वानाडोंगरीत ज्वेलर्सवर भरदिवसा सशस्त्र दरोडा

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT