राख वाहतुक विरोधात बीडच्या कण्हेरवाडी ग्रामस्थांचा रस्ता रोको विनोद जिरे
महाराष्ट्र

राख वाहतुक विरोधात बीडच्या कण्हेरवाडी ग्रामस्थांचा रस्ता रोको

राख वाहतुक बंद न झाल्यास, राख प्रशासनाच्या दारात आणून टाकू असा इशारा आंदोलकांनी प्रशासनास दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - बीडच्या परळी तालुक्यातील कण्हेरवाडी येथील ग्रामस्थ, राख प्रदूषण आणि वाहतूकी विरोधात आक्रमक झाले आहेत. दाऊतपूर शिवारातून केली जाणारी राख वाहतूक बंद करावी ही मागणी घेऊन कण्हेरवाडी ग्रामस्थांनी परळी-अंबाजोगाई महामार्ग आडवत तब्बल दोन तास रस्ता रोको केला होता. Road Block Agitation of Kanherwadi villagers of Beed against ash transport

हे देखील पहा -

परळीच्या दाऊतपुर शिवारातून औष्णिक विद्युत केंद्रातील, हजारो टन राख अवैधरित्या वाहतूक केली जाते. याकडे आरटीओ, पोलीस प्रशासन व तहसिल प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे, परळी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे या अवैध राख वाहतुकी विरोधात परळी-अंबाजोगाई मार्गावर कण्हेरवाडी ग्रामस्थांनी दोन तास रास्ता रोको केला.

जर आठ दिवसात अवैध राख वाहतूक करणारी वाहने बंद केले नाही, तर समस्त गावकऱ्यांच्या वतीने वाहने अडवून वाहनांचे नुकसान केले जाईल आणि या वाहनांमधील राख प्रशासनाच्या दारात आणून टाकण्यात येईल, असा इशारा माणिक फड यांनी दिला आहे. दरम्यान यावेळी परळी-अंबाजोगाई या महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT