Parbhani Accident News राजेश काटकर
महाराष्ट्र

Parbhani Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत १३ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू; दोन जण जखमी

Parbhani Accident News: एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक १३ वर्षीय मुलगा ठार झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहे.

राजेश काटकर

परभणी: जिंतूर तालुक्यातील येलदरी रोडवरील केहाळ फाट्यावर एक दुर्देवी अपघात (Accident) झाला आहे. एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक १३ वर्षीय मुलगा ठार झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. जिंतूर (Parbhani) तालुक्यातील माणकेश्वर येथील रहिवासी असलेले तिघे जण दुचाकीवरुन येलदरी येथे कामा निमित्त जात असताना केहाळ फाट्यावर अज्ञात वाहनाने समोरुनच दुचाकीला धडक दिली. (Parbhani Accident News)

यामध्ये दुचाकीवरील विठ्ठल पापनकर (वय 13 वर्ष, रा. हिंगोली) या लहानग्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर, दुचाकीवरील नागनाथ चव्हाण (रा.माणकेश्वर ता जिंतूर) गंभीर जखमी झाले असून लहान मुलगा गोपाळ जाधव रा. हिंगोली हा किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाताची माहीती मिळताच जिंतूर ग्रामीण रुग्णालयात तिघांनाही उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन एकास मृत घोषित केले. तर गंभीर जखमीवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT