satara news saam tv
महाराष्ट्र

Satara : साताऱ्यात पालिका इमारतीचा पाया खोदताना मिळाला ब्रिटीशकालीन साठा; रायफलींच्या गोळ्या, दस्ता, मॅगझीन (पाहा व्हिडीओ)

सध्या हा साठा पोलिसांच्या ताब्यात आहे.

ओंकार कदम

सातारा : सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा पाया जेसीबीच्या सहाय्याने खोदताना तब्बल एक हजार ब्रिटिशकालीन रायफलच्या गोळ्या, दस्ता, मॅगझिनचा मोठा साठा आढळला आहे. घटनास्थळी पोलिसांनी (police) धाव घेत सर्व साठा ताब्यात घेतला.

हा साठा लवकरच छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. सातारा येथील केसरकर पेठेतील नगरपालिकेची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी कमी पडू लागल्याने जिल्हा परिषदेसमोर नगरपालिकेच्या जागेत नवीन इमारतीचे काम सुरु केले आहे. याठिकाणच्या जागेची साफसफाई करुन सध्या जेसीबीच्या सहाय्याने पाया खोदण्याचे काम सुरु आहे.

हे काम सुरु असताना पुरातन काळातील रायफलींच्या गोळ्या, दस्ता, मॅगझिनचा मोठा साठा आढळला. काही क्षणातच बघ्यांची मोठी गर्दी जमली.माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुरातत्व विभागालाही याबाबत कल्पना देण्यात आली. सध्या हा साठा पोलिसांच्या ताब्यात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT