Chandrashekhar Bawankule on Farmer Loan Waiver Saam Tv News
महाराष्ट्र

सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय लवकरच, पण 'या' शेतकऱ्यांना अजिबात कर्जमाफी नाही; भाजपच्या नेत्यानं स्पष्ट सांगितलं

Chandrashekhar Bawankule on Farmer Loan Waiver : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Prashant Patil

अमरावती : राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी सातत्याने पुढे येत असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी कर्जमाफीबाबत योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलंय. त्यानंतर, आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमातून राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना, राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर बोलताना सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, 'ले-आऊटवाल्यांना, फार्म हाऊसवाल्यांना आणि कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही', असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

'आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लाडक्या बहि‍णींसाठी जो महिना १५०० रुपये सुरू केला होता, तो पुढच्या काळात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की, पुढील ५ वर्ष शेतात वीजेचं बिल येणार नाही. तसेच, आमच्या सरकारनं सांगितलं की, खऱ्या खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत. त्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत, पण शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतल्या, ज्यांचे लेआऊट आहेत, फार्म हाऊससाठी कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी भेटणार नाही. धन दांडग्यांना कर्जमाफी नको, ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळायला हवी', असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितलं.

'कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे, अधिवेशन काळात ती समिती घोषित करू, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यासोबत कालच चर्चा झाली आहे, आमची समिती तयार होत आहे, अधिवेशन काळात ती घोषित करू. येत्या ३ तारखेला ४ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्यासोबत विधानभवनात बैठक होणार आहे. माझ्या दालनात बैठका होणार आहेत. या बैठकीत ८ ते १० मंत्री सोबत असतील, तेव्हा महत्त्वाच्या निर्णयाचे शासन निर्णय होतील', असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

SCROLL FOR NEXT