नोकरीसाठी घेतलेले पैसे परत करा; अन्यथा... आव्हाडांची दलालांना तंबी!  SaamTvNews
महाराष्ट्र

नोकरीसाठी घेतलेले पैसे परत करा; अन्यथा... आव्हाडांची दलालांना तंबी!

नोकरीसाठी ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे. असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : म्हाडाच्या (Mhada) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. असा विश्वास राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी म्हाडा नोकरभरती (recruitment) च्या उमेदवारांना दिला आहे. यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले, म्हाडा मध्ये नोकरी लावून देतो या आमिषाने विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे.

हे देखील पहा :

माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. काही जणांनी आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. असे करून त्यांनी पैसे दलालांना दिले आहेत. माझी या दलालांना नम्र विनंती आहे कि हे पैसे त्यांनी संबंधित उमेदवारांना परत करावेत.

पैसे घेऊन तुम्ही त्यांच काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. पण, नोकरीसाठी ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे. असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत. गरिबांचे शाप घेऊ नका कृपया म्हाडाची नोकरी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत त्यांनी उद्या रात्रीपर्यंत ते पैसे परत करावेत. कारण तुमच्या पैशाने हे काम होईल हा जरी तुम्हांला कोणी विश्वास दिला असेल तर ते कदापि शक्य नाही. असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT