अहमदनगर जिल्ह्यात निर्बंध; मात्र वरखेड गावात मोठी यात्रा  गोविंद साळुंके
महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात निर्बंध; मात्र वरखेड गावात मोठी यात्रा !

राज्यात यात्रेला बंदी असताना तसेच अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध प्रशासनाने कायम ठेवले असताना नेवासा तालुक्यातील वरखेड गावात मोठी यात्रा भरल्याची माहिती समोर येत आहे.

Krushnarav Sathe

शिर्डी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यात्रेला बंदी असताना तसेच अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध प्रशासनाने कायम ठेवले असताना नेवासा तालुक्यातील वरखेड गावात मोठी यात्रा भरल्याची माहिती समोर येत आहे. येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत सोशल डिस्टंन्सीगचे तीन तेरा वाजवलेत! यात्रे दरम्यान काही बोकडांचा बळी दिला असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन च्या कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा -

अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने भर पडत असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचे कोणतेही निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत. मात्र, असे असताना देखील जिल्ह्यात वरखेड येथे यात्रा भरून गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक जमले होते.

या यात्रेदरम्यान हजारो बोकडांचा बळी दिला असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर जिल्हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतोय. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना वरखेड गावात मात्र, मोठ्या प्रमाणावर यात्रा भरत असेल तर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे असेच म्हणावे लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ; पण कुणाला मिळणार लाभ? राज्य सरकारच्या योजनेत नेमकं काय?

Weather Update : मोठी बातमी! अखेर 'तो' क्षण आला; पुढील काही तासांत मान्सून धडकणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

French Toast Recipe: सकाळी झटपट करा टेस्टी फ्रेंच टोस्ट; लहानमुलं पोटभर करतील नाश्ता

SCROLL FOR NEXT