ओमायक्रॉन व्हायरसच्या अनुषंगाने सोलापुरात निर्बंध लागू Saam Tv
महाराष्ट्र

ओमायक्रॉन व्हायरसच्या अनुषंगाने सोलापुरात निर्बंध लागू

देशासमोर नव्याने उभे ठाकलेल्या ओमायक्रॉन व्हायरसच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन कडक निर्बंधाचा निर्णय घेतला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : ओमायक्रॉन व्हायरसच्या संकटावर सोलापूर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर कडक बंधने घालण्यात आली आहेत. जिल्ह्यात अद्याप 10 लाख लोकांचे लसीकरण बाकी असून लस घेणाऱ्या नागरिकांनाच शासकीय कार्यालयात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. देशासमोर नव्याने उभे ठाकलेल्या ओमायक्रॉन व्हायरसच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन कडक निर्बंधाचा निर्णय घेतला आहे.

जिल्हातील सर्व कार्यक्रमांला निर्बंध घालून दिले आहेत. दोन्ही लसीकरण पूर्ण करणाऱ्या नागरिकांनाच सरकारी कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या ओमायक्रॉन व्हायरस थैमान घालतोय. तो व्हायरस जलद पसरणारा आहे, त्यामुळे संपुर्ण जगाची चिंता वाढली आहे. देशाबरोबरच राज्यात देखील निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारने काही भागात लेवल ३ तर काही भागात लेवल ४ चे निर्बंध लावले आहेत. तसेच कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहनही सरकारच्यावतीने करण्यात आलं आहे. विमान प्रवासाच्या आधी 48 तास RTPCR बंधनकाराक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

High Court : 'Rent’ शब्द वापरल्याने भाडेकरूचा दर्जा मिळत नाही; ३२ वर्षे सुरु असलेल्या खटल्यावर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

AI Scam: आवाज बदलून गंडा घालणाऱ्यांना लगाम कसा लागणार? झोहो CEOचा भन्नाट उपाय; 'वर्बल पासवर्ड' कसे करेल काम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT