रेमडेसिविर काळाबाजार, वॉर्डबॉयला 5 वर्ष सश्रम कारावास Saam Tv
महाराष्ट्र

रेमडेसिविर काळाबाजार, वॉर्डबॉयला 5 वर्ष सश्रम कारावास

रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणामध्ये दहा दिवसातील ही दुसरी शिक्षा

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - कोरोना Corona या अजरावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिविर Remdesivir या इंजेक्शनचा Vaccine काळाबाजार Black Market करणाऱ्या वॉर्डबॉय Ward Boy शेख आरीफ शेख रफिक याला सत्र न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास आणि त्यासोबत 5000 रुपये दंड आकारला आहे. दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली आहे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. घुगे यांनी हा निर्णय दिला. शेख आरीफ शेख रफिक हा तेलीपुरा, शांतीनगर येथील रहिवासी आहे. तो होप हॉस्पिटलमध्ये Hospital वॉर्डबॉय म्हणून काम करत होता.

हे देखील पहा -

होप हॉस्पिटलमधील रेमडेसिविर आणि इतर काही महत्त्वाची इंजेक्शन चोरून आरोपी दुसरीकडे विकत होता. कोरोनावरील इंजेक्शन्सचा साठा कमी आढळल्याने हॉस्पिटल प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्यानुसार आरोपीची बॅग तपासली असता त्यात दाेन रेमडेसिविर, आणि इतर काही महत्त्वाची इंजेक्शन आढळून आले. आरोपीविरूद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणामध्ये दहा दिवसातील ही दुसरी शिक्षा असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणात तिघांचे निलंबन; ॲट्रॉसिटी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Hair Growth Tips: कापलेले केस वाढत नाहीत? मग या टिप्सचा लगेचच करा फॉलो

Bhajani Chakali Recipe : भाजणीचे पारंपरिक सीक्रेट जाणून घ्या, चकली होईल खमंग-कुरकुरीत

Kalyan Water Issue : कल्याणमध्ये पाणी समस्येवरून मनसेचा संताप; केडीएमसीच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला घातला ‘चपलेचा हार’

WTC Points Table: पाकिस्तानच्या विजयानं भारताचं गणित बिघडलं; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT