उस्मानाबादमध्ये कोविड नियमांत शिथिलता  SaamTv
महाराष्ट्र

उस्मानाबादमध्ये कोविड नियमांत शिथिलता

उस्मानाबादमध्ये आता दुकानाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याला कोविड निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. तसे आदेश देखील जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यसरकारच्या नियमावलीनुसार उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोविड-19 प्रसार थांबविण्यासाठी निर्बंध घातले होते.

हे देखील पहा -

मात्र, आता राज्य सरकारने नव्याने काढलेल्या नियमावलीनुसार 22 जिल्ह्यांना शिथिलता देण्यात दिली आहे. या यादीत उस्मानाबादचा देखील समावेश आहे. त्यामुळे आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नवीन आदेश काढून शिथिलता देत दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे आता दुकानाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत करण्यात आली आहे.

तर शनिवारी व रविवार रोजी अत्यावश्यक सेवेत असणारी दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या दुकानांना शनिवारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे, तर रविवारी मात्र ही दुकाने बंद ठेवावी असे आदेश आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालवण बाजारपेठेत आग लावून सलूनचे दुकान जाळले.

ओव्हरटेकवरून वाद... नंतर रागाने पाहिलं, नागपूरात अभियांत्रिकी विद्यार्थ्याची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या

Albattya Galbattya Natak: कल्याणच्या नाट्यगृहाची अवस्था पाहून कलाकार संतापले; 'अलबत्या गलबत्या' कलाकारांचा व्हिडिओ व्हायरल

Thane Politics : ठाण्याच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, कारण काय?

Kalyan Crime: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कल्याणमधील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT