Pune : रुग्नाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा हॉस्पिटलमध्ये राडा! दिलीप कांबळे
महाराष्ट्र

Pune : रुग्नाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा हॉस्पिटलमध्ये राडा!

हॉस्पिटलमधील डॉक्टरांना शिवीगाळ आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करत हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. सदर घटना देहूच्या युनिकेअर हॉस्पिटल मध्ये घडली आहे.

दिलीप कांबळे

मावळ : उपचार घेत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्यांनतर मयत महिलेच्या नातेवाईकाने हॉस्पिटलमधील डॉक्टरांना शिवीगाळ आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करत हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. सदर घटना देहूच्या युनिकेअर हॉस्पिटल मध्ये घडली आहे. मारहाणीचा आणि तोडफोडीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी तुषार सुरेश चव्हाण याच्या विरोधात, डॉ.सुहास जोशी यांच्या फिर्यादीवरून देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा :

घटनेचे सविस्तर वृत्त असे की, आरोपी तुषार याची आजी बेशुद्ध पडल्याने बेशुद्ध अवस्थेत त्यांना युनिकेअर हॉस्पिटलमध्ये आणले होते. उपचार सुरू असताना तुषारच्या आजीचा मृत्यू झाला. याबाबत फिर्यादी डॉ. सुहास जोशी यांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर तुषार याने हंबरडा फोडून हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. मोठमोठ्याने आरडा ओरड करून हॉस्पिटलची शांतता भंग करून, ड्युटीवर उपस्थित डॉ. संदीप पवार आणि डॉ.आनंद दुगड यांना शिवीगाळ करून अंगावर धावून गेला.

यावर न थांबता मयत आजीच्या नातवाने, हॉस्पिटलच्या काचेचा दरवाज्यावर जोराची लाथ मारली. बीपी मोजण्याचे मशीन फेकून त्याचे नुकसान केले. हॉस्पिटलमध्ये गोंधळ करून गणपती चे डेकोरेशन तोडून टाकले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकार वाढलेत, त्यामुळे वैद्यकीय सेवा देणारे हात ही भीतीने थरथर कापत आहेत. एखादा अतिदक्षता विभागातील रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात आला तर त्याच्यावर उपचार करायचे की नाही, हाच प्रश्न या डॉक्टर मंडळींसमोर उभा राहिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत FDA ची ‘एन्ट्री’

Accident News : रक्षाबंधन अखेरचं ठरलं! दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबातील ४ जणांना ट्रकने उडवलं; बहीण भावाचा जागीच मृत्यू

September Rule Changes: दुधापासून ते LPG सिलिंडरपर्यंत... १ सप्टेंबरपासून बदणार हे ९ नियम; सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार परिणाम

Crime : प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या समर्थकाला संपवलं, घराजवळच भयंकर हल्ला; शहरात प्रचंड खळबळ

Krishna Janmashtami 2026 : 4 की 5 सप्टेंबर? यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT