धक्कादायक : विवाहितेचा मृत्यू, अंगावरती मारहाणीचे व्रण; पतीसह सासरची मंडळी फरार संजय जाधव
महाराष्ट्र

धक्कादायक : विवाहितेचा मृत्यू, अंगावरती मारहाणीचे व्रण; पतीसह सासरची मंडळी फरार

सासरकडील मंडळींनी कार घेण्यासाठी माहेरुन 2 लाख घेऊन ये असा तगादा मृत महिलेकडे लावला होता. आणि त्यासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून मृत श्रद्धा यांचा शारिरीक व मानसिक छळ सुरु होता.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : गळफास लागलेल्या स्थितीत खामगाव येथील एका विवाहितेला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान रात्री त्या विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र सदर मृत महिलेच्या अंगावरती मारहाण झाल्याचे व्रण आढळून आल्याने विवाहितेची सासरकडील लोकांनी तिची हत्या केली असल्याचा आरोप मृतक महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी खामगाव पोलिसात (Khamgaon Police) पतीसह पाच जणांविरुध्द गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी सध्या फरार आहेत.

हे देखील पहा -

श्रध्दा गजानन वैतकार वय 24 राहणार गोपाळनगर, खामगाव असे मृत विवाहितेची नाव असून सदर विवाहितेला सासरकडील मंडळी कार घेण्यासाठी माहेरुन 2 लाख आणण्याचा तगादा लावला होता. आणि त्यासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून मृत श्रद्धा यांचा शारिरीक व मानसिक छळ सुरु होता.

दरम्यान सदर विवाहितेता हि राहत्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. तिला नातेवाईकांनी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये (Private Hospital) भरती केले. दरम्यान उपचार सुरु असतांना रात्री तिचा मृत्यू झाला, याबाबत मृतक विवाहितेचे वडिल भानुदास मोतीराम काळींगे (55) रा. खंडाळा बाळापूर यांनी आज शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विवाहितेचा पती गजानन रामदास वैतकार, सासरा रामदास वैतकार, सासू उषा बैतकार, नणंद दीपा प्रभाकर पातोंड व प्रभाकर पातोंड यांचेविरुध्द कलम 498 अ 304, 323,504.34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT