Maharashtra Corona Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा उद्रेक; 41 हजार 327 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात गेल्या 24 तासात 41,327 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 72,11,810 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 40,386 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 68,00,900 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 41,327 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 72,11,810 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 40,386 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 68,00,900 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. (Maharashtra Corona Update)

गेल्या 24 तासात 29 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,41,808 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 2,65,346 रुग्ण अॅक्टीव आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कमी होईल असे संकेत देखील दिले आहेत.

ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती

गेल्या 24 तासात राज्यात 8 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात 1738 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 932 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: राम मंदिरातून दररोज ६ ते ८ लाखांची चोरी; पैसा नेमका कुठे जात होता?

Low Heart Rate: लो हार्ट रेटमुळे ब्लड प्रेशरही कमी होऊ शकतो का? ही लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Face Care: चाळीशीतही २० वर्षांच्या मुलीसारखा गुलाबी ग्लो पाहिजे? मग फेसवॉश नव्हे, वापरा 'ही' घरगुती सामग्री

काळाचा घाला! रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडले; ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT