Solapur Tuljapur Highway , solapur news, Rayat Kranti Sanghatana, Rasta Roko Andolan, Farmers, surat chennai greenfield highway saam tv
महाराष्ट्र

Rasta Roko At Solapur Tuljapur Highway : रयत क्रांती संघटनेने राेखला सोलापूर - तुळजापूर महामार्ग, वाहतुक ठप्प (पाहा व्हिडिओ)

विश्वभूषण लिमये

Solapur Tuljapur Highway News : जमीन भुसंपादनाचा योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला असून शेतक-यांना सोलापूर - तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदाेनल छेडलं आहे. परिणामी सोलापूर - तुळजापूर महामार्गावरील दाेन्हीकडील वाहतुक ठप्प झाली. (Maharashtra News)

सुरत - चेन्नई ग्रीन फिल्ड हायवे (surat chennai greenfield highway) आणि सोलापूर रिंगरोडच्या (solapur ringroad) भुसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आज (साेमवार) रयत क्रांती संघटनासमवेत सोलापूर - तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या आंदाेलनात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी बांधव सहभागी झाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या जमिनी या भुसंपादनात जाणार आहेत. त्यामुळे सध्या शासनाकडून जो मोबदला दिला जातं आहे त्याच्या चार पटीने मोबदला द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. या आंदाेलनात महिलांसह छाेटी मुले देखील सहभागी झाले आहेत.

आंदाेलकांनी रुग्णवाहिकेस दिली वाट

शेतकऱ्यांच्या या रस्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक पुर्णत: खोळंबली. दरम्यान हे आंदाेलन सुरु असताना महामार्गावर एक रुग्णवाहिका आली. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी ॲम्बुलन्सला लगेचच वाट माेकळी करुन दिली. यामुळे आंदोलकांची संवेदनशीलता दिसून आली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT