ravikant tupkar 
महाराष्ट्र

मस्ती आलीय त्या चेअरमनला, उद्याच बघताे त्याला : रवीकांत तुपकर

शेतकऱ्यावर हात उचलणाऱ्याचे हात कलम करू असा इशारा तुपकारांनी यावेळी दिला.

संजय जाधव

बुलडाणा (buldhana) : शेतक-यांचे शाेषण करणा-यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना धडा शिकवेल असा इशारा संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी दिला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मकाई साखर कारखाना येथे स्वाभिमानीचे काही कार्यकर्ते व शेतकरी एफआरपीचे पैसे मागण्यांसाठी गेले हाेताे. त्यावेळी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी संबंधितांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. यावर रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी दिग्विजय बागल (digvijay bagal) यांना इतक्या मस्तीत वागू नका असा इशारा दिला आहे.

तुपकर म्हणाले त्यांच्या साखर कारखान्याला गाळप करण्याचा परवाना नाही. तरी बेकायदेशीर गाळप सुरू आहे. मागील वर्षी शेतक-यांचे एफआरपीचे (frp) साडेसहा कोटी रुपये त्यांनी बुडविले आहेत. शेतकरी त्यांच्या घामाचा पैसा मागण्यासाठी गेले हाेते. तेथे त्यांच्यावर हात उचलण्यात आला. उदयाच मी सोलापूर जिल्ह्यात जात आहे. दिग्विजय बागलची मस्ती उतरविणार असून शेतकऱ्यावर हात उचलणाऱ्याचे हात कलम करू असा इशारा तुपकारांनी यावेळी दिला.

देशातील नामचिन गुंडांना कायद्याचा धाक दाखविण्यात आला आहे. तुम्ही नियमबाह्य वागत असून शेतक-यांना लुबाडत आहात. तुमचा माज आणि मस्ती स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही असा इशारा तुपकारांनी बागल यांना दिला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ४ वर्षांचा चिमुकला अंगणवाडीतच अडकला; आई-बाप रात्रभर शोधत बसले, सकाळी कुलुप उघडलं...!

Maharashtra Live News Update: अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ सुविधा एप्रिलपासून होणार सुरू

Health Care : महिलांनी पपई कधी खाऊ नये, नेमकं कारण काय? काय होतील परिणाम?

Kolhapur : शिवजयंतीला तरूणांची हुल्लडबाजी, पन्हाळा गडावर नको ते केले अन् लाज काढली, पाहा व्हिडिओ

Black Elbow Tips: हातांच्या कोपरांचा काळेपणा कसा घालवायचा?

SCROLL FOR NEXT