ravikant tupkar 
महाराष्ट्र

'अन्यथा राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली राज्यात आगाडाेंब उसळेल'

भुरटी दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही.

भारत नागणे

पंढरपूर (pandharpur) : आठ दिवसांत शेतक-यांना थकती एफआरपीची (frp) रक्कम मिळाली नाही आणि बेकायदेशिररित्या गाळप करणा-यांवर कारवाई झाली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्रात आगाडाेंब उसळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे नेते रवीकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी येथील प्रशासनास दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी युवा संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे यांना करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज (साेमवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली करमाळा येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना तुपकर म्हणाले भुरटी दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला कोणी अशा पद्धतीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही त्याच पद्धतीने उत्तर देईल. शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी जीव गेला तरी बेहत्तर पण स्वाभिमानी शेतकरी संघटना आता गप्प बसणार नाही थकीत एफआरपीची रक्कम जमा व्हावी यासाठी माेठं आंदाेलन छेडेल असा इशारा तुपकर यांनी दिला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, लोकलमधून पडून ३ प्रवाशांचा मृत्यू

Prajakta Mali Education: जुळून येती रेशीमगाठी फेम मेघना किती शिकलीये?

दोन सिलिंडरचा स्फोट आणि संपूर्ण इमारतीला आग; पाहा VIDEO

गरोदरपणात महिलांचं किती वजन वाढणं नॉर्मल?

SCROLL FOR NEXT