Raju Shetti, Ravikant Tupkar, Swabhimani Shetkari Sanghatana saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana: आम्हाला एका पाॅकेटपुरती चळवळ उभी करायची नाही : रविकांत तुपकर; राजू शेट्टींनी सवयीप्रमाणे...

Siddharth Latkar

- संदीप भाेसले

Latur News :

एका पाॅकेट पुरते आम्हांला चळवळ उभी करायची नाहीये, आम्हांला सबंध महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे असे मत शेतकरी नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar latest marathi news) यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनी सवयी प्रमाणे हातकणंगले मतदारसंघात (hatkanangale) कुणाशी हात मिळवणी केली असेल तर त्यात नवल काय अशी टिप्पणी तुपकरांनी केली. (Maharashtra News)

रवीकांत तुपकर म्हणाले ऊस दर वाढीसाठीचे आंदोलन फक्त पश्चिम महाराष्ट्रातच होतात. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन, ऊस ,कापूस उत्पादक तसेच निराधार यांच्या प्रश्नावर कुणी बोलत नाही. त्यामुळे आम्ही सोयाबीन, ऊस ,कापूस उत्पादक तसेच निराधार यांच्या मागण्यांसाठी औसा येथे महाआक्रोश मोर्चा काढण्याचे निश्चित केले. त्यास आज शेतकरी भरभरुन प्रतिसाद देतील असा विश्वासही तुपकर यांनी व्यक्त केला.

राजू शेट्टी यांचा लातूर दौरा

दरम्यान आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे देखील लातूर दाै-यावर येणार आहेत. शेट्टींची शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक आहे. याबाबत तुपकर यांना छेडले असता त्यांनी आज होणारा औसा येथील महाआक्रोश मोर्चा हा पूर्वनियोजित आहे. त्यामुळे मी आलो आहे. हा मोर्चा पक्ष विरहित, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी आणि निराधारांसाठी आहे असे तुपकरांनी स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले राजू शेट्टी जरी मराठवाड्यात आले तर त्यांचं स्वागतच आहे. मात्र ते लातूर जिल्ह्यात येतं असल्याची कुठलीही कल्पना नाही. त्यांना अधिकार आहे कुठेही फिरायचं त्यामुळे ते येत असतील.

दरम्यान एका प्रश्नावर उत्तर देताना आम्हांला पॉकेट पुरत राजकारण करायचं नाही. आम्हाला सबंध महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे असे स्पष्ट केले. बुलढाणा लाेकसभा मतदारसंघ आम्ही सर्व शेतक-यांनी एकजूटीने लढण्याचा निर्धार केला आहे असेही तुपकरांनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : चेंबूरच्या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Abhijeet Sawant Success Story : इंडियन आयडल जिंकून रात्रीत स्टार, बिग बॉस मराठी गाजवलं, कोट्यवधींच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिजीतचा संघर्षमय प्रवास, वाचा

SCROLL FOR NEXT