रवी राणा - उद्धव ठाकरे 
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंची परदेशात अवैध मालमत्ता - रवी राणांचा आरोप

ज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परदेशात अवैध मालमत्ता आणि काळा पैसा असल्याचा आरोप बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केला आहे

अरूण जोशी

अमरावती : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची Uddhav Thackeray परदेशात अवैध मालमत्ता आणि काळा पैसा Black Money असल्याचा आरोप बडनेराचे आमदार रवी राणा Ravi Rana यांनी केला आहे. तसेच या काळ्या पैशांचा आपल्याकडे पुरावा असून लवकरच पुरावे ईडीला देणार असल्याचे रवी राणा यांनी म्हटलं आहे. Ravi Rana Allegation on Cm Uddhav Thackeray

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयनं स्थगिती दिली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंकडे काळा पैसा असून तो परदेशात असल्याचे रवी राणा यांनी म्हटलं आहे.

हे देखिल पहा

खासदार रवी राणा याच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबतच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. याबाबत नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परदेशात अवैध संपत्ती आहे. परदेशात हॉटेल,घर स्वरुपात विदेशात संपत्ती निर्माण केली आहे. या सगळ्याबाबत माझ्याकडे ठोस पुरावे आहेत. हे पुरावे लवकरच ईडी आणि सीबीआयला देणार असल्याचे रवी राणा यांनी म्हटलं आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT