Ratnagiri Accident Saam Tv
महाराष्ट्र

Ratnagiri Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, डंपरने दुचाकीला उडवले, उच्चशिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर काम करणाऱ्या इगल इन्फ्रा कंपनीच्या पाण्याच्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला.

Priya More

अमोल कलये, रत्नागिरी

रत्नागिरीमध्ये भीषण अपघातामध्ये उच्चशिक्षित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे रत्नागिरीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावर काम करणाऱ्या इगल इन्फ्रा कंपनीच्या पाण्याच्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये उच्चशिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रत्नागिरीतल्या हातखंबा इथे रात्री हा अपघात झाला. या अपघातामध्ये शिशिर रावणंग या ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

शिशिर रावणंग हा तरुण रत्नागिरीतल्या निवळी या गावामध्ये राहणारा होता. घराच्या दिशेने येत असताना ही अपघाताची घटना घडली. तरुणाच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच निवळी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Cancer: नेल एक्स्टेन्शन करत असाल तर सावधान! नखाखाली दिसणारी ही छोटी काळी रेघ ठरू शकते जीवघेण्या कॅन्सरची पहिली घंटा

Maharashtra News Live Update: समगा नदीला पूर, 15 गावांचा संपर्क तुटला

Soaked almonds benefits: रात्रभर दूधात भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Pune : शालेय विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेवकाचे पाय धुण्याचा प्रकार; फोटो व्हायरल, राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त

Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

SCROLL FOR NEXT