Mumbai Goa Highway Parshuram Ghat Saam tv
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway Parshuram Ghat: मुंबई- गोवा महामार्गांवरील परशुराम घाटातील काम ग्रामस्‍थांनी पाडले बंद

मुंबई- गोवा महामार्गांवरील परशुराम घाटातील काम ग्रामस्‍थांनी पाडले बंद

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

चिपळूण (रत्नागिरी) : मुंबई- गोवा महामार्गांवरील परशुराम घाटातील (Parshuram Ghat) सुरु असलेले काम आज स्थानिक ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. स्थानिक लोकांच्या वाहतुकीच्या मागण्या मान्य न केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महामार्गाचे काम बंद पाडले आहे. (Maharashtra News)

मुंबई– गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्‍त्‍याचे काम सुरू आहे. स्थानिकांना येण्याजाण्याचे मार्ग व्यवस्थित करून द्या, संरक्षक भिंत बांधा मगच काम सुरू करा; अशी ग्रामस्थांची मागणी होती. मात्र स्थानिक लोकांच्या वाहतुकीच्या मागण्या मान्य न करता वारंवार सांगूनही ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे परशुराम घाटाच्या परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गाचे काम बंद पाडले आहे.

ठेकेदाराने बोलाविले पोलिसांना

वारंवार सांगूनही ठेकेदाराच्या (Mumbai Goa Highway) दुर्लक्षामुळे परशुराम घाटाच्या परिसरातील ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी घाटात सुरु असलेले काम बंद पाडले असून आता ठेकेदार कंपनीने याठिकाणी पोलिसांना बोलावले आहे. पोलीसांकडून ग्रामस्थांना सध्या समजावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पावसाल्यापूर्वी घाटाचे काम होणे अत्यंत आवश्यक असतानाच आता ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT