Ratnagiri News Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri News: खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी; तिघे तस्‍कर पोलिसांच्‍या ताब्‍यात

खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी; तिघे तस्‍कर पोलिसांच्‍या ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

रत्‍नागिरी : दुर्मिळ वन्यप्राणी असलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या तिघांना पोलीस व वन विभागाच्या (Forest Department) पथकाने सापळा रचून पकडले आहे. यात तीन आरोपींना अटक करत गुन्हा (Crime) दाखल केला आहे. (Breaking Marathi News)

खेड- मंडणगड (Ratnagiri) मार्गावरून खवले मांजरांच्या खवल्यांची तस्करी होणार असल्याची माहिती खेडचे पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांना मिळाली होती. त्यानुसार खेड व मंडणगड पोलीस (Police) आणि मंडणगड वन विभागाचे संयुक्त पथक तयार करून लाटवन येथील घाटात आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.

दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना पथकाने थांबवून त्यांची तपासणी केली. त्यांच्याकडे 4 किलो 372 ग्रॅम वजनाचे खवले मांजराची खवले मिळून आली. यावेळी घटनास्थळी आलेली एक चारचाकी वाहनाने अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्यावर वन्य जीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मंडणगडचे वनपाल अनिल दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

Benefits of walking: निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मिळाली! दररोज चाला फक्त इतकी पावलं, वजनही होईल कमी

CNG Price Cut: नवीन वर्षात खुशखबर! CNG आणि PNG च्या किंमती झाल्या कमी; किती होणार फायदा?

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या भावाच्या जागेत १४५ कोटींचं ड्रग्ज सापडलं, अंधारेंचा आरोप, प्रकाश शिंदे म्हणाले....

Hatgad Fort : हतगड किल्ला ट्रेकर्ससाठी भटकंतीचं खास ठिकाण, वीकेंडला नक्की जा

SCROLL FOR NEXT