Ratnagiri News
Ratnagiri News Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri News: जगबुडी नदीत आढळली महाकाय मृत मगर; महिनाभरात दुसऱ्या मगरीचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

रत्‍नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जगबुडी नदी पत्रात एका महाकाय मगरीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. जगबुडी नदीला प्राप्त झालेले कचऱ्याचे स्वरूप लक्षात घेता प्रदूषणामुळेच नदीतील मगरींचे अस्तित्व धोक्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. (Live Marathi News)

खेड (Rantagiri) शहरातील मटण मार्केट शेजारी जगबुडी नदी किनाऱ्यावर एक महाकाय मृत मगर आढळून आल्याची माहिती वन विभागाला मिळाली. यानंतर (Forest Department) वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खेड नगर परिषदेच्या जेसीबी मशिनद्वारे मृत मगर लाकडी सरणावर ठेवत नदी पत्रातच या मृत मगरीची विल्हेवाट लावली. कचऱ्यामुळे आधीच प्रदूषित झालेल्या नदीपात्रात मृत मगरीची विल्हेवाट लावल्याने स्थानिक जनतेतून वन विभागाला नदी पत्रात होत असलेल्या प्रदूषणाचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जगबुडी नदी किनारी आढळलेली मृत मगर ही जवळपास 10 फूट इतकी लांब होती. ही मगर अंदाजे 10 वर्षे वयाची असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. वन विभागातील वनरक्षक श्री. डोईफोडे यांनी सहकाऱ्यांसह या मृत मगरीची विल्हेवाट लावली. दरम्यान शासनाकडून एकीकडे चला जाणूया नदीला हे अभियान राबवून नदीचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच खेडमध्ये मात्र सद्यस्थितीला प्रदूषित झालेल्या जगबुडी नदी पत्रात मृत मगरीची विल्हेवाट लावण्याच्या वन विभागच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

Rahul Gandhi: सत्तेत आल्यास 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, आरक्षणावर राहुल गांधींची मोठी घोषणा

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

SCROLL FOR NEXT