Ratnagiri News Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri News: भरणे नाका येथे घरात आढळले ८३ जिवंत गावठी बॉम्ब

भरणे नाका येथे घरात आढळले ८३ जिवंत गावठी बॉम्ब

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात भरणे नाका येथे एका (Ratnagiri News) व्यक्तीच्या घरामध्ये तब्बल ८३ जीवंत गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ही कारवाई गुरूवारी सायंकाळी उशिरा खेड (Police) पोलिसांच्या पथकाने केली आहे. (Live Marathi News)

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भरणे नाका येथील एका संशयिताच्या घरी पोलिसांनी छापा मारला असता हा गावठी बॉम्बचा साठा मिळून आला आहे. या गावठी बॉम्बचा वापर हा वन्यप्रण्यांच्या शिकारीसाठी केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. खेडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

गुन्‍हा दाखल

या प्रकरणी खेड पोलीस स्थानकामध्ये रात्री उशिरा गुन्हा नोंदण्यात आला. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्बचा साठा मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT