Maharashtra Scholarship 2023 ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्र

Maharashtra Scholarship 2023: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शिष्यवृत्ती संदर्भात मंत्री उदय सामंत यांचं महत्वाचं वक्तव्य...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शिष्यवृत्ती संदर्भात मंत्री उदय सामंत यांचं महत्वाचं वक्तव्य...

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Scholarship 2023: रत्नागिरी येथील शिक्षण संस्थामधील महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृतीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर येत्या 30 जून पर्यंत कशा पद्धतीने वितरीत करता येईल याचे सुयोग्य नियोजन संबंधित विभागाने करावे, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज शिष्यवृत्ती वाटपाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत.

ते म्हणाले, वर्ष 2022-23 या वर्षाकरिता शिष्यवृत्तीची रक्कम जमा आहे. या शिष्यवृतीमध्ये 60 टक्के केंद्राचा तर राज्य सरकारचा 40 टक्के इतका वाटा आहे, विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती न पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. (Latest Marathi News)

शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. याच्या अनुषंगाने 10 जूनपर्यंत संस्था चालक, प्राचार्य यांची बैठक घेण्यात यावी अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली

समाज कल्याण विभागाने शिष्यवृत्ती वाटपाच्या अनुषंगाने गुगलशीटमध्ये सर्व माहिती भरून ती यादी अद्ययावत करावी, अशी सूचना जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Havoc : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा! भिंत कोसळून मुलीचा मृत्यू; होर्डिंग पडून तरुणाचा जागीच अंत

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांचं पुणे-नाशिक महामार्गावर आंदोलन

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! मुठा नदीवरील पूल कायमचा बंद, पानशेत पुलाबाबतही मोठा निर्णय; पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today : खुशखबर! सोन्याचे दर वाढले की घसरले? लगेचच जाणून घ्या 24k, 22k, 18k सोन्याचे दर

HBD Tejashri Pradhan : 'वीण दोघांतली ही तुटेना'साठी स्वानंदी किती पैसा घेते? तेजश्री प्रधानच्या संपत्तीचा आकडा वाचून घाम फुटेल

SCROLL FOR NEXT