Ratnagiri Killing Case Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Ratnagiri Killing Case update : एका तरुणाला त्याच्या स्वप्नात मृत व्यक्ती वाचवण्याची विनंती करतो. त्यानंतर तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. ही सिनेमातील कथा नसून रत्नागिरीतील हत्याकांड आहे.

साम टिव्ही

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : एका तरुणाला स्वप्न पडतं. स्वप्नात एक मृत व्यक्ती वाचवण्याची विनंती करतो. वारंवार पडणारं स्पप्न तरुण पोलिसांना सांगतो आणि पोलिस FIR दाखल करतात. त्यानंतर सुरू होतो पोलिसांचा तपास. या तपासात कुजलेला मृतदेह आढळून येतो. ही घटना कुठल्या सस्पेन्स हॉरर-थ्रिल चित्रपटातील नाही तर कोकणातील रत्नागिरीच्या खेडमधून समोर आलीय.

नाव- योगेश पिंपळ आर्या. या 30 वर्षीय तरुणाला वारंवार एक स्वप्न पडतं. त्यात खेड रेल्वे स्टेशनजवळच्या डोंगरात एका पुरुषाची डेड बॉडी मला वाचवा, अशी याचना करते. त्यामुळे योगेश पिंपळ आर्या 17 सप्टेंबरला रत्नागिरीच्या खेड पोलिसांत तक्रार दाखल करतो. पोलिसही योगेशच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतात. पोलीस योगेशवर विश्वास ठेवत या परिसराची कसून तपासणी करतात. मात्र त्यांच्या समोर आलेल्या दृश्यानं पोलीसही चक्राऊन जातात.

या कुजलेल्या मृतदेहाजवळ कोणत्या वस्तू आढळून आल्यात पाहूयात....

मृतदेहाजवळ आढळलेल्या वस्तू

काळ्या रंगाची वायर, प्लॅस्टिकच्या पट्ट्या बांधून टॉवेलने गळफास

अंगात राखाडी रंगाचं जॅकट आणि पँट

पायाजवळ आदिदास कंपनीची सॅक

मृतदेहापासून 5 फुटावर कवटी

खेडमध्ये आढळून आलेला मृतदेह बऱ्याच दिवसांचा असल्याचं दिसून येतंय. मात्र हा मृतदेह कुणाचा आहे? याची उकल होणं बाकी आहे. मात्र पडलेल्या स्वप्नामुळे मृत्यूचं गूढ उलगडलं असला तरी ही आत्महत्या की हत्या? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे पोलिस तपासात काय समोर येणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT