Dapoli Govinda News  Saam TV
महाराष्ट्र

Dapoli News : दहिहंडी उत्सवात शोककळा; नाचता नाचता गोविंदाचा दुर्देवी मृत्यू

पाज पंढरी गावातील एका गोविंदाचा नाचतांना मृत्यू झालाय.

साम टिव्ही ब्युरो

अमोल कलये, साम टिव्ही

Dapoli Dahi Handi News : संपूर्ण राज्यात आज दहीहंडीचा (Dahi Handi) उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. सकाळपासून गोविंदा पथकांकडून एकावर एक थर रचून रचून दहीहंडी फोडण्यात येत आहेत. दरम्यान, एकीकडे दहीहंडी उत्साहात साजरी करताना दुसरीकडे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात एक भयंकर घटना घडलीये. दापोली गावातील पाज पंढरी गावातील एका गोविंदाचा नाचतांना मृत्यू झालाय. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वसंत लाया चौगले असं मृत्युमुखी पडलेल्या गोविंदाचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, दापोली तालुक्यातील हर्णै पाज पंढरी गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कार्यक्रमात होमाआळी मंडळातले सदस्य देखील सामील झाले होते. सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह गेला पोहोचला होता. यामध्ये चौगुले सहभागी होते.

दरम्यान, अचानक नाचत असताना चौगुले यांच्या छातीत कळ आली आणि त्यांना तीव्र ह्रदयविकाराचा झटका आला. नाचताना ते जमिनीवर कोसळले. त्यांच्यासोबत असलेल्या इतर सहकार्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता.

सगळीकडे दहीहंडीचा सण उत्सावात साजरा केला जात असताना, अचानक चौगुले यांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. चौगुले यांच्या मृत्यूची बातमी कळताच, पंचक्रोशीतील गोविंदावर दुःखाचे सावट पसरलं आहे.

मुंबईत आतापर्यंत १११ गोविंदा जखमी

राज्यात तब्बल दोन वर्षानंतर गोविंदा पथके कोरोना विषयक निर्बंधमुक्त दहीहंडी साजरी करीत आहेत. या दहीहंडीला गालबोट देखील लागलं आहे. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी १११ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी गोविंदावर मुंबईच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काही गोविंदांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमध्ये दुपार पर्यंत १११ गोविंदांना दुखापत झाली, यामधील ८८ जणांना उपचार करून सोडून देण्यात आलं आहे. तर २३ जणांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या कोणत्याही गोविंदाची प्रकृती गंभीर नाही.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT