Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: पादचारी तरुणाला अज्ञात वाहनाची धडक; पाय तुटून तरुण जखमी

पादचारी तरुणाला अज्ञात वाहनाची धडक; पाय तुटून तरुण जखमी

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

रत्‍नागिरी : मुंबई- गोवा महामार्गावर हातखंबा तिठा येथील बाबल धाब्यानजीक ३५ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या (Accident) अपघातातील तरुण जखमी झाला असून पायाचे दोन तुकडे झाले. अज्ञात वाहनाने तरुणाला जोरदार धडक देऊन तेथून पळ काढल्याचे वृत्त आहे. (Live Marathi News)

हातखंबा तिठा येथे झालेल्‍या अपघातात प्रशांत होरंबे (वय ३५ रा. पानवळ) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. ईश्वर धाबा ते शांती धाबा या भागातील (Ratnagiri News) रस्ता पूर्ण खडबडीत असल्यामुळे चौपदरीकरणाची एक लेन सुरू करण्यात आली आहे. या काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावरुन वाहने भरधाव वेगाने जात असतात. प्रविण होरंबे हा तरुण घरी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. वाहनाची धडक इतकी जोरदार होती की, प्रवीणच्या एका पायाचे जागेवरच दोन तुकडे झाले.

प्रवीण हा दारूच्या नशेत असल्याचे बोलले जात आहे. ही धडक चारचाकी वाहनाने दिल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. आता फरार वाहन चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. तसेच या भागात सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर पोलीस धाड टाकणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : संतापजनक; रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत गैरवर्तन, रात्री परतताना चालकाचे कृत्य

"RSS रजिस्टर आहे का?" सुजात आंबेडकरांचा थेट सवाल|VIDEO

Pancake Recipe: फक्त १० मिनिटांत बनवा टेस्टी अन् सॉफ्ट पॅनकेक, सोपी रेसिपी वाचा

Plane Crash: टेकऑफ करताच विमान क्रॅश, आगीचा गोळा बनत खाली पडले; थरकाप उडवणारा VIDEO

Maharashtra Live News Update: मंगळवेढा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे आमने सामने येणार

SCROLL FOR NEXT