माजलगावमध्ये रेशनचा काळ्या बाजारात जाणारा तांदळाचा ट्रक पकडला! SaamTvNews
महाराष्ट्र

माजलगावमध्ये काळ्या बाजारात जाणारा रेशनच्या तांदळाचा ट्रक पकडला!

यामध्ये 27 टन तांदळासह तब्बल 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विनोद जिरे

बीड : बीडच्या माजलगावमध्ये काळ्याबाजारात तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पकडण्यात आलाय. यामध्ये 27 टन तांदळासह तब्बल 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माजलगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील युसूफ इसाक आतार हा व्यक्ती रेशनच्या अन्नधान्याचा काळाबाजार करत असल्याची माहिती, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली.

हे देखील पहा :

त्यानंतर त्यांनी माजलगाव ठाण्याच्या पोलिसांसोबत या ठिकाणी छापा घातला. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये तांदळाचे 50 किलोचे तब्बल 558 कट्टे आढळून आले आहेत. हे तांदळाचे कट्टे गुजरात येथे विक्रीसाठी ट्रक मध्ये भरण्याचे काम सुरू होते. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता युसूफ याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. संशय वाढल्याने पोलिसानी त्याचा माल तपासणी केला असता हा सगळा रेशनचा तांदूळ असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी 6 लाख 98 हजार रुपयांच्या तांदळासह, 25 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 31 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर आरोपी युसूफ इसाक आतार अटक करत त्याच्यावर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT