Rat Droppings Found In Kachoris, Rat Spotted In Biryani Rice | Maharashtra Food Safety Shock saam tv
महाराष्ट्र

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

Kachori and Biryani Contamination Shocks Consumers: राज्यात अन्नातल्या भेसळविरोधात जोरात कारवाई सुरू आहे...मात्र तरीही अनेक दुकानं आणि हॉटेल्समध्ये नागरिकांच्या आरोग्य़ाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. हॉटेल्समधल्या कचोरी आणि बिर्याणीत काय काय आढळू लागलंय हे तुम्हाला सांगितलं तर तुम्ही हे पदार्थ खाणचं सोडून द्याल...नेमका कुठे आणि कसा घडलाय हा प्रकार पाहूयात या रिपोर्टमधून ...

Suprim Maskar

पाहिलंत... तुम्हाला वाटलं असेल इतक्या नोटा आल्या कुठून... तर ही आहे एका महिलेनं केलेली तब्बल 8 वर्षांची बचत... मात्र, व्हिडिओत दिसत असलेल्या नोटा कुणी कुरतडल्या?... असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं झालं असं की, उत्तर प्रदेशातील गोंडा येथील एका महिलेनं पतीपासून लपवून लाखो रुपये वाचवले होते. मात्र, तिने बचत केलेल्या पैशांवर उंदरांनी डल्ला मारलाय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. नेमका हा सगळा प्रकार काय आहे?... ते पाहूयात...

पाहिलंत.... एकीकडे कचोरीत उंदाराच्या लेंड्या आणि दुसरीकडे बिर्याणीच्या भातात उंदराचा मुक्त संचार... हा किळसवाणा प्रकार आपल्याच राज्यातला आहे... एकीकडे FDAनं अन्नातील भेसळीविरोधात मोहिम उभारलेली असताना दुसरीकडे राज्यात खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय... वैजापूर शहारात वडीलांनी मुलासाठी आणि कुटुंबियांसाठी मिठाईच्या एका दुकानातून 5 कचोऱ्या खरेदी केल्या...मात्र घरी गेल्यानंतर त्यातील सर्वच कचोऱ्यांमध्ये डझनभर उंदराच्या लेंड्या आढळल्यानं वडिलांचा संताप झालाय...नेमकं काय घडलं ऐका...

दुसरीकडे नालासोपाऱ्याच्या वाकणपाडा परिसरात ‘तबेला चहा जमजम बिर्याणी’ सेंटरमध्येही असाच किळसवाणा प्रकार घडला....बिर्याणीसाठी शिजवलेल्या भातात बसून उंदीर चक्क भात खात असल्याचं दिसतयं... दरम्यान वैजापूरमध्ये कचोरीत उंदाराच्या लेंड्या आढळल्याची बातमी साम टिव्हीनं लावून धरल्यानं एफडीएनं संबंधित मिठाईच्या दुकानावप कारवाई केलीय...

सध्या तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून कारवाईचा धडाका सुरू आहे. एफडीएची पथकं दररोज राज्याच्या विविध भागांत धाडी टाकत असून, भेसळयुक्त अन्नपदार्थ नष्ट करण्याचं आणि परवाने रद्द करण्यासारख्या कठोर कारवाया करत आहेत...या कारवाईपासून मोठे ब्रँडही सुटले नाहीत...मात्र छोट्या मोठ्या दुकानदारांनी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच ठेवलाय. त्यामुळे एफडीएनं यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण अखेर प्रश्न नागरिकांच्या जीवाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT