satara, chhatrapati shivaji maharaj, Social Media saam tv
महाराष्ट्र

Satara News : छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट, हजाराे युवकांनी राेखला सातारा- पंढरपूर महामार्ग

पाेलिसांनी युवकांना आश्वासित करीत शांतता राखण्याचे आवाहन केले.

ओंकार कदम

Satara Breaking News : समाज माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून महाराष्ट्राची व छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचा प्रकार सातारा जिल्ह्यात घडला. हा प्रकार निंदनीय असून हजाराे युवकांनी आज (गुरुवार) संबंधितावर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर रास्ता राेकाे आंदाेलन छेडले. (Maharashtra News)

छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घाेषणा देत आज सकाळी साडे दहाच्या सुमारास शेकडाे युवक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमले. या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी थांबवावी अशी मागणी करत आंदाेलनास प्रारंभ केला.

यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी तसेच काही युवकांनी प्रशासनास निवेदन दिले. शिवरायांबद्दल समाज माध्यमातून केली जाणारी बदनामी खपवून घेतली जाणार नाही. संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

दरम्यानच्या काऴात हजाराे युवक (satara) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जमले हाेते. या युवकांनी रास्ताे राेकाे करुन संबंधितावर कठाेर कारावाई हाेत नाही ताेपर्यंत रस्त्यावरच बसून राहणार अशी भूमिका घेतली. यामुळे पाेवई नाका परिसरातील वाहतुकीवर ताण पडला. पाेलिसांनी युवकांना आश्वासित करीत शांतता राखण्याचे आवाहन केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

SCROLL FOR NEXT