Devendra Fadnavis - Rashmi Thackeray Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Statement: रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ? अलिबागमधील 19 बंगला घोटाळ्याप्रकरणी फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Political News: अलिबागमधील असलेल्या १९ बेकायदा बंगल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. एकापाठोपाठ पक्षातील शिलेदार शिंदे गटात जात आहेत. यादरम्यान, अलिबागमधील असलेल्या १९ बेकायदा बंगल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट समोर आली आहे. (Latest Marathi News)

भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर अलिबागच्या उद्धव ठाकरे यांच्या पत्नीव अलिबागच्या जंगलात १९ बंगले बांधल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला मुलाखतील या प्रकरणावर मोठं भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले, 'अलिबागच्या जंगलात १९ बंगले बांधल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे'.

बेकायदा बंगल्याप्रकरणी रश्मी ठाकरे यांची चौकशी होत नाही, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'रश्मी ठाकरेंची आवश्यकता नाही. तसेच चौकशी कुणाची करावी आणि कुणाची नाही हे सरकार ठरवत नाही. चौकशीबाबत पोलीस ठरवतात'.

फडणवीस पुढे म्हणाले, 'अलिबागमधील असलेल्या १९ बेकायदा बंगल्याप्रकरणात सरकार हस्तक्षेप करत नाही. ज्याप्रकारे उद्धव ठाकरे हस्तक्षेप करत होते. आम्ही हस्तक्षेप केला तर व्यवस्था ही व्यवस्थित चालणार नाही. पोलिसांना ज्याची चौकशी करायची आहे, ते पोलीस करतील. जो चुकीचा असेल त्याच्यावर कारवाई होणार'.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं. फडणवीस म्हणाले, 'सुशांत आणि दिशाच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून पुरावे गोळा करण्याचं काम जलद गतीने सुरू आहे. सर्व पुरावे जमा झाल्यावर सदर प्रकरण समोर आणणार आहे. मिळालेल्या सर्व पुराव्याच्या आधारावर तपासणी सुरू आहे. या पुराव्यात काही तथ्य आढळले तर त्यानुसारत कारवाई केली जाणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्पना खरात अटकपूर्व जामीन प्रकरण तहकूब

Makeup Side Effects : मेकअप करायला खूप आवडतो? मग शरीरावर होणारे 'हे' गंभीर दुष्परिणाम वाचून बसेल धक्का

आसाममध्ये पुन्हा NDA सरकार; हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ,VIDEO

Mango : आंबा खाल्ल्यानंतर पाणी कधी प्यावे? आताच जाणून घ्या वेळ, अन्यथा होतील गंभीर आजार

शाळा-मंदिरांजवळील ७१७ दारूची दुकाने बंद करा, मुख्यमंत्री विजय यांचा धडाकेबाज निर्णय

SCROLL FOR NEXT