Rashmi Thackeray at Thane women’s cultural event where BJP leader Sushmita Bhosale officially joined Thackeray Sena, boosting party expansion ahead of the crucial Mumbai civic elections 2025. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पक्षवाढीसाठी रश्मी ठाकरे मैदानात, भाजपच्या सुश्मिता भोसलेंचा ठाकरे सेनेत प्रवेश

Uddhav Thackeray Gets Stronger Support: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठाकरे सेना सज्ज झाली आहे. उद्धव ठाकरे ठिकठिकाणी शाखांना भेटी देत कार्यकर्त्यांना मागर्दर्शन करीत आहेत. दुसरीकडे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही पक्षवाढीसाठी मैदानात उतरल्यायत...

Girish Nikam

ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये ठाकरेसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमात भाजपच्या महिला पदाधिकारी असणाऱ्या सुश्मिता भोसलेंनी चक्क मशाल हाती घेतली. रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्याचा ठाकरे सेनेत पक्षप्रवेश झाल्यानं आता पक्षवाढीसाठी खुद्द रश्मी ठाकरेच मैदानात उतरल्याची चर्चा सुरू झालीय.

शिवसेनेंच मुखपत्र असलेल्या दैनिकाच्या संपादक राहिलेल्या रश्मी ठाकरे यांच व्यक्तिमत्त्व प्रभावी आहे. पक्षाच्या अनेक जाहीर सभांना त्या नेहमीच उपस्थित असतात. एवढंच नव्हे तर पक्षातल्या घडामोडींवर त्यांच बारीक लक्ष असतं अशी चर्चा ही दबक्या आवाजात कायम सुरू असते.

2002 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जबाबदारी दिली. 2003 साली उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले. तेव्हापासून रश्मी ठाकरे राजकारणात उद्धव यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत.

पक्षवाढीसाठी रश्मी ठाकरे मैदानात

रश्मी पाटणकर ते "रश्मी उद्धव ठाकरे"

रश्मी ठाकरे या मूळच्या डोंबिवलीच्या

उद्योजक माधवराव पाटणकर यांची कन्या

पदवी शिक्षणानंतर काही काळ नोकरी

1989 साली उध्दव ठाकरे आणि रश्मी यांचं लग्न

ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींसोबत ही त्यांनी चर्चाही केली.

विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेला अपेक्षित यश मिळालेलं नाही त्यामुळे पालिका निवडणुक आता ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळेच रश्मी ठाकरेही पुढे सरसावल्या आहेत..त्यांचा हा करिष्मा ठाकरे सेनेला किती फायद्याचा ठरणार हे आगामी निवडणुकीत कळेलच....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AC: एसी वापरूनही वीज बिल येईल कमी; फक्त 'या' ६ टिप्स वापरा

Laxman Hake : आमच्या ४ पिढ्या घाबरल्या, पण आता बोलणार, आंदोलन करणार; लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर

The Bads Of Bollywood Premiere: आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रिमियरला बॉलिवूडची हजेरी

University Exam Fee Hike: विद्यार्थ्यांवर खर्चाचा भार; विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात २०टक्क्यांनी वाढ

Maharashtra Live News Update: आयुष कोमकर हत्या प्रकरण; ३ महिलांना न्यायालयीन कोठडी, तर सर्व पुरुष आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT