रायगडमध्ये आढळला दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार' saam tv
महाराष्ट्र

पिवळा आणि नारंगी रंगाचा मासा कधी बघितलाय का? रायगडमध्ये आढळला दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार'

Raigad News : रायगडच्या पाली सुधागड तालुक्यात परदेशी मासा नजरेस पडला आहे. नदीत असा अनोखा जीव पाहताच परिसरात याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सदर मासा हा दुर्मिळ असून पुराच्या पाण्यातून किंवा कोणी नदी पात्रात सोडला असावा असे मत्सतज्ञांचे म्हणणे आहे.

Shruti Vilas Kadam

निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार रायगड जिल्ह्यात घडला आहे. उत्तर अमेरिका आणि ब्राझीलमधील नद्यांमध्ये आढळणारा हा मासा महाराष्ट्रात अंबा नदीच्या पात्रात पाहायला मिळाला आहे. परिसरात या अनोख्या माश्याची चर्चा रंगली असून बघ्यांची गर्दी जमली आहे. पाली सुधागड तालुक्यातील वावे गावाजवळून वाहणाऱ्या अंबा नदीच्या पात्रात एक अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण मासा आढळून आला आहे. या परदेशी प्रजातीच्या माश्याचे नाव 'अल्बिनो एलीगेटर गार' असून तो चमकदार पिवळ्या आणि नारंगी रंगाचा आहे. शुक्रवारी सकाळी वावे येथील स्थानिक तरुण कैलास हिलम आणि केतन म्हसके हे नदीकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान त्यांना नदीपात्रात हा आकर्षक रंगाचा मासा मृत अवस्थेत पडलेला दिसून आला. नदीत असा अनोखा जीव पाहताच परिसरात याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

निसर्गातील अशा दुर्मिळ जनुकीय बदलाची (अल्बिनो अवस्था) ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. नुकताच माणगाव शहरात अतिवृष्टीमुळे जमिनीबाहेर पडलेला पांढऱ्याशुभ्र रंगाचा अत्यंत दुर्मिळ 'अल्बिनो चंचु वाळा' हा बिनविषारी साप आढळून आला होता. त्या सापाप्रमाणेच या माशाच्या शरीरातील नैसर्गिक रंगद्रव्ये नष्ट झाल्याने त्याला हा अनोखा रंग प्राप्त झाला आहे.

वन्यजीव अभ्यासक सागर दहिंबेकर यांनी सांगितले की 'गार' प्रजातीचे मासे त्यांच्या टोकदार तोंडासाठी आणि मगरीसारख्या दिसणाऱ्या जबड्यासाठी ओळखले जातात. निसर्गामध्ये या माशांचा मूळ रंग गडद किंवा राखाडी असतो. परंतु, जनुकीय बदलांमुळे या विशिष्ट माशाचा रंग पूर्णपणे पांढरा किंवा चमकदार पिवळा-नारंगी झाला आहे.पुरामुळे कोणाच्यातरी फिश टॅंक मधून किंवा कोणीतरी तलावा मध्ये सोडला असेल किंवा पुराचे पाणी आत गेल्याने तो बाहेर वाहून आला असेल.

ही प्रजाती मूळची भारतातील नसून ती उत्तर अमेरिका आणि ब्राझीलमधील नद्यांमध्ये आढळतो. हा मासा अत्यंत झपाट्याने वाढतो. येथील नदी व तलावतील माशांसाठी तो घातक आहे. त्वचारोग झाल्याने त्याची त्वचा अशी दिसते. हा आजार दुर्मिळ आहे आणि अशाप्रकारे आजार असलेला मासा फार दिवस मोकळ्या पर्यावरणात राहू शकत नाही. कारण त्याला इतर प्राण्यांपासून धोका असतो. सदर मासा हा कोणीतरी फिश टॅंक मध्ये पाळण्यासाठी आणला असावा आणि त्यानंतर त्याला सांभाळणे शक्य न झाल्यामुळे नदीमध्ये सोडला असावा. मत्सतज्ञ नितीन निकम यांनी सांगितले आहे.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT